अमळनेर;- शहरातील धुळे-चोपडा रा.म.१५” मार्गावरील “वेस” की (दगडी दरवाजा) पुर्वेकडील भाग जिर्ण झालेने अतिवृष्टीमुळे कोसळुन रहदारीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाल्याने सदर रस्ता बंद करून शहरातील गांधलीपुरा भागातून वाहतूक वळविण्याचे कळवून देखील सदर भागातील रस्त्यावर असलेले अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने अजूनही नहटविल्याने फार मोठा अनर्थ घडू शकतो म्हणून शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेने राज्याचे सार्वजनिक मंत्री सह जळगांव जिल्हा अधिकारी यांना पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सदर निवेदनात “धुळे-चोपडा रा.म.१५” मार्गावरील “वेस” की (दगडी दरवाजा) पुर्वेकडील भाग जिर्ण झालेने अतिवृष्टीमुळे कोसळुन रहदारीस मोठ्या प्रमाणावर अडथडा निर्माण झालेने, शासन-पुरातत्व-विभागाने सदर रस्त्यावरील वहातूक इतरत्र म्हणजे गांधलीपुरा नविन-पुलाकडून वळविणे कामीची बाबअमळनेर उप-विभागीय अधिकारी यांचे कडील बैठकीत मान्य करणेत आलेली आहे. तसेच मा.पालकमंत्री, जळगांव जिल्हा, जळगांव यांनी देखील आपणास स्वतंत्रपणे निर्देश दिले असुन, सदरचा मार्ग आपले अखत्यारीत असतांना, देखील न.पा.ने शासन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलीत – वस्ती सुधार योजनांतर्गत सदर रस्ता रुंदीकरण विकसनाकामी अनुदान मंजुर केलेले आहे. असे असतांना देखील सदरच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढणेकामी सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर आणि नगरपरिषद अमळनेर हे अक्षम्यपणे दुर्लक्ष करीत आहेत.
३ दिवसाचे आत सदर रस्त्यावरील अतिक्रमीत-अनाधिकृत घरांचे अतिक्रमणे न हटविलेस आम्हास जन-आंदोलन करणे भाग पडेल याची नोंद घ्यावी. अश्या आशयाचे पत्र देण्यात आले आहे. सदर पत्रावर डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष रामभाऊ संदांनशीव व ऍड ब्रम्हे यांच्या स्वाक्षरी आहेत.