ख्राइस्टचर्च (वृत्तसंथा) – भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतावर न्यूझीलंडने सात गाडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडनं एकदिवसीय मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही २-० असा विजय मिळवून भारताला व्हाइटवॉश दिला. भारतानं पहिल्या डावात २४२ धावा केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजांनी न्यूझीलंडला २३५ धावांवर गुंडाळलं होतं. भारत या कसोटीत वापसी करून कसोटी मालिका बरोबरीत सोडवणार असं वाटलं होतं. मात्र, गोलंदाजांनी कमावलं आणि फलंदाजांनी गमावलं असं चित्र दुसऱ्या डावात पाहायला मिळाली. दुसऱ्या डावात भारताचा डाव अवघ्या १२४ धावांवर आटोपला. न्यूझीलंडनं ३ गड्यांच्या मोबदल्यात १३२ धावांचं लक्ष्य सहज गाठलं.
भारताला पहिल्या कसोटीतही न्यूझीलंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. भारतानं ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत न्यूझीलंडला व्हाइटवॉश दिला होता. मात्र, वनडे मालिका आणि त्यापाठोपाठ कसोटी मालिकेतही भारताला पराभवाचा सामना करावा लागला.