जळगाव महापालिका पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांचा म्रुत्यु

जळगाव ( प्रतिनिधी ) – आजारातही विश्रांतीची सुटी नसल्याने ह्रुदयविकाराचा झटका आल्याने महापालिका कर्मचाऱ्यांचा म्रुत्यु झाल्याचा आरोप या मयत कर्मचाऱ्यांच्या आप्तांनी केला आहे. या घटनेमुळे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी सन्तापले आहेत.
विष्णू पुंडलिक धांडे (वय ५६ , मुळ रा — सुनसगाव ता. भुसावळ) येथील रहिवासी आहेत सध्या ते तळले काँलणी ( जुना खेडी रोड जळगाव ) येथे राहत आहे.
आज शहरात जुने जळगाव भागात राम पेठ परिसरात पाणी सोडताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले त्यांना तेथील नागरिकांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले सीएमओ डॉ. संदिप पाटील यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. यांच्या पच्छात पत्नी , १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे
जळगाव महानगरपालिका येथे ते पाणी पुरवठा कर्मचारी होते पंधरा दिवसा पूर्वी त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. आणि पाच दिवसा पासून त्यांना पोटाचा त्रास होत असल्याने डॉक्टरांनी त्याना बेडरेस्ट घेण्याचे सांगितले असता धांडे यांनी महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुट्टी मागीतली होती. पंरतु त्यांनी सुट्टी दिली नाही म्हणून ते आराम करु शकले नाही असा आरोप त्यांचे जावाई मोहन नेमाडे यांनी केला आहे.







