एरंडोल;- जगभर कोरोना आपत्तीचे संकट घोंगावत असतांना डगमग न होता, येणाया काळात करोनाशी सकरात्मकतेने जळवून योग्य ती काळजी व उपाय योजना केल्यास जग पुन्हा नव्याने उभारी घेईल असा आशावाद दोन दिवसीय राष्ट्रीय वेबीनार मध्ये तज्ज्ञ मानशास्त्रज्ञांनी केला.
यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे डिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, एरंडोल येथील मानसशास्त्र विभाग, आणि आयक्युएसी विभागातर्फे दोन दिवसीय राष्ट्रीय वेबीनार आयोजित केला गेला. विषय होता ‘सकारात्मकतेतून करु या कोरोना संकटावर मात.’
दिल्ली, मुंबई आणि पुणे येथील तज्ज्ञ मानसशास्त्रज्ञांनी याप्रसंगी विचार व्यक्त करतांना सांगितले की, करोना जागतिक समस्या निश्चितच आहे मात्र इतर रोगांसारखेच त्याकडे पाहून सकारात्मक जीवनशैली, आवश्यक ती खबरदारी आणि प्रबळ आशावाद या मुख्य बाबींकडे लक्ष दिल्यास निश्चितच आपण त्याचा सामना करु. उद्घाटन सत्रातील प्रास्ताविक डॉ. रेखा साळुंखे, समन्वयक तथा विभाग प्रमुख, मानसशास्त्र विभाग यांनी केले. डॉ. सी.जी. देशपांडे, पुणे यांनी वेबीनारसाठी शुभेच्छा दिल्यात. स्वागत संबोधन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.आर.पाटील यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष श्री. अमित पाटील यांनी अशा लोकपयोगी वेबीनारच्या आयोजनाबद्दल मानसशास्त्र विभाग व आयक्युएसी विभागाचे अभिनंदन केले. प्रथम सत्रातील संबोधनात डॉ. अवधेश शर्मा, मनोचिकित्सक, दिल्ली यांनी भावनात्मक लवचिकता या विषयावर आपले बीज भाषण प्रस्तुत केले. आभार डॉ. रेखा साळुंखे यांनी केले.दुसया सत्राचे समन्वयन डॉ. अरविंद बडगुजर, समन्वयक आयक्युएसी यांनी केले. डॉ. शोभना अभ्यंकर, माजी प्राचार्य फर्ग्युसन कॉलेज, पुणे यांनी कोरोना संदर्भातील समस्यांच्या सामना या विषयावर आपले सादरणीकरण केले. परिचय व आभार डॉ. बडगुजर यांनी केले.
वेबीनारच्या समारोप सत्रात मुंबई विद्यापीठ मुंबई येथील मानसशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. विवेक बेल्हेकर यांनी करोना पश्चात नोकरी, उद्योग आणि करीयर संभाव्य स्थितीचा आढावा घेतला. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजच्या डॉ. मेघा देवूस्कर यांनी आपल्या अभ्यासपुर्ण सादरीकरणात रोगप्रतिकारक शक्ति कशी वाढवावी यावर प्रकाश टाकला.सत्राचे समन्वयक डॉ. अरविंद बडगुजर यांनी केले तर राष्ट्रीय वेबीनार मधील वक्ते, सहभागी, यांचे आभार चंद्रकांत वाय पाटील, कनिष्ठ महाविद्यालय, मानसशास्त्र विभाग यांनी केले.
या दोन दिवसीय राष्ट्रीय वेबीनारचा लाभ सुमारे सात हजार लोकांनी ऑनलाईन प्रक्षेपणाद्वारे
घेतला. तर देशभरातून अठराशे सहभागींनाी नोंदणी केली.