जळगाव ;- येथील जिल्हा उप कारागृहासमोर असणाऱ्या धान्य गोडाऊनजवळ आज दुपारी कार मधून आलेल्या अज्ञात तीन ते चार जणांनी पूर्ववैमनस्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने दोघांवर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज तीन वाजेच्या सुमारास घडल्याने यामुळे खळबळ उडाली आहे . फौजी उर्फ सनी जाधव ( रा. रामेश्वर कॉलनी ) , आणि रणजित कोळी रा जैनाबाद असे गंभीर जखमी झालेल्या तरुणांचे नाव असून त्यांना उपचारासाठी जिल्हापेठ पोलिसांनी गोदावरी महाविद्यालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. आरोपींचा पोलीस शोध घेत असून जखमी तरुण हे कैद्याला भेटण्यासाठी आल्याचे सूत्रांनी सांगितले.