मुंबई (वृत्तसंस्था ) – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. व्हेलेंटाईन डे निमित्त अमृता फडणवीस यांनी गाणे प्रसिद्ध केले आहे.
‘ये नयन डरे डरे’ असे या गाण्याचे नाव आहे. एका समुद्र किनाऱ्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. त्यांच्या या नव्या गाण्याचे सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांनी स्वागत केले आहे. तर अनेक जणांनी अमृता फडणवीस यांना ट्रोलही केले आहे. या गाण्याला आतापर्यंत ११७, ७६५ व्ह्यूज मिळाले आहेत.