जळगाव – गोदावरी इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च (आयएमआर) जळगाव महाविद्यालयात सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन शिवजयंती उत्साहात साजरी केली.
महाविद्यालयाचे संचालक डॉ.प्रशांत वारके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे तत्वांचे सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोना महाराष्ट्रात पुन्हा पाय पसरवत आहे तरी आपण सर्वांनी या परिस्थीतीला तोंड दिले पाहिजे, मास्क, सोशल डिस्टन्सचा वापर केला पाहिजे जेणेकरुन कोरानाला आळा घालता येईल असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी डॉ.प्रशांत वारके, डॉ.निलीमा वारके, प्रा.मकरंद गोडबोले, डॉ.अनुभूती शिंदे, प्रा.मेघा पाल, प्रा.चेतन सरोदे, प्रा.वैजंती असोदेकर, प्रा.समृद्धी रडे, प्रा.आफ्रीन खान, प्रा.चंद्रकांत डोंगरे, प्रा.अश्विनी सोनावणे, प्रा.श्रृतिका नेवे, दिपक दांडगे, योगेश नेतकर, मयुर पाटील, प्रविण वाणी, स्वपनिल चौधरी, ललित खडके, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, प्रफुल्ल भोळे, घनश्याम पाटील आदि उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्राजक्ता पाटील यांनी केले.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी
जळगाव – छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम व स्वराज्यासाठी त्यांची निष्ठा सर्वांनाच प्रेरित करते, महाराजांना प्रेरित असा शिवजयंती उत्सव गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात १९ रोजी उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवजयंती साजरा करण्याचा उद्देश असा की, महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहचवावेत व त्यामाध्यातून राष्ट्रीय प्रगती साधावी हा हेतु शिव जयंतीच्या माध्यमातून साध्य होतो. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.प्रविण फालक यांनी शिवमुर्तीचे पुजन करुन मार्ल्यापण केले. यावेळी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रा.ईश्वर जाधव, अधिष्ठाता प्रा.हेमंत इंगळे तसेच विभाग प्रमुख, शिक्षक वृंद उपस्थीत होते.