पारोळा ;- पारोळा येथे आज रोजी भीम आर्मी सामाजिक संघटने तर्फे कोरोना योद्धांचा सत्कार करून शिवजयंती साजरा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सदानंद भावसार सर यांनी आपले मनोगत व्यक्त करत आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे विचार आत्मसात करण्याचे गरजेचं असल्याचे मत व्यक्त करत भीम आर्मी च्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाकचे प्रमुख अतिथी म्ह्णून राणी लक्ष्मीबाई महाविद्यालयाचे प्राचार्य डी आर पाटील सर उपस्थित होते.
कार्यक्रमात पोलीस निरीक्षक लिलाधार कानडे, महसूल कर्मचारी जगदीश पाटील, भूमी अभिलेख कार्यालयातील बैरागी साहेब, रुग्णवाहिका चालक ईश्वर ठाकूर, रोशन पाटील, न. प . आरोग्य निरीक्षक तुकडू नरवाडे, समाजसेविका शोभाताई पाटील तर पत्रकार श्री अभय पाटील , रावसाहेब भोसले, पत्रकार श्री संजय पाटील यांना पुष्पगुच्छ आणि शिवरायांची मूर्ती भेट देऊन या कोरोना योद्धांचा सत्कार आणि सम्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमात श्री करोडपती सर ,जेष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, शेतकरी संघटनेचे पृथ्वीराज पाटील, नगरसेक डी बी पाटील, ऍड रणजित बिऱ्हाडे, तलाठी निशिकांत माने, गौरव लांजेवार, भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती चे जिल्हाध्यक्ष महेश पाटील, शिव छावा चे सागर भोसले , मराठा सेवा संघाचे सचिन पाटील, संदीप पाटील सर यांच्यासह भीम आर्मी चे तालुका प्रमुख जितेंद्र वानखेडे, ऍड स्वाती शिंदे,भाऊसाहेब सोनवणे हर्षल सूर्यवंशी, प्रताप पाटील, मनोहर संदनशिव, सचिन खेडेकर, सागर पवार ,कुणाल गायकवाड उपस्थित होते.