जळगाव – जळगाव व धुळे जिल्ह्यातील सहा तालुक्यांना वरदान ठरणारा तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प, पाडळसे हा लवकरच पूर्ण होऊन याठिकाणी येत्या अडीच-तीन वर्षात पाणीसाठा होण्यास सुरुवात होईल. असा विश्वास राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. मंत्री ना. पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील मौजे पाडळसे गावाजवळील तापी नदीवर निम्न तापी प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमास आमदार अनिल पाटील, आमदार लताताई सोनवणे, माजीमंत्री एकनाथराव खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, साहेबराव पाटील, प्रा. शरद पाटील, मनीष जैन, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बी. एस. स्वामी, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य अभियंता एम. एस. आमले, रुपालीताई चाकणकर, पुष्पलताताई पाटील, जयश्रीताई पाटील, नाशिक येथील मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेचे मुख्य अभियंता श्री. मंदाळे, अधिक्षक अभियंता पी. आर. मोरे, राजेश मोरे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, कार्यकारी अभियंता रजनी देशमुख, हेमंत खोरगडे, रविंद्रभैय्या पाटील, अभिषेक पाटील आदि उपस्थित होते.








