जळगाव;- जिल्ह्यात अधिकाधिक दर्जेदार खेळाडू तयार व्हावेत, याकरीता जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडूंना माफक दरात चांगल्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेत.
जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित, श्री. शिव छत्रपती पुरस्कार विजेते डॉ प्रदिप तळवेलकर, नगरसेवक नितिन बर्डे, श्याम कोगटा आदि उपस्थित होते.