जळगाव ;- जेष्ठ कवी वि. वा . शिरवाडकर यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो . या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना , सांस्कृतिक विभाग, मध्यवर्ती ग्रंथालय व विद्यार्थी विकास विभाग याच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २७ फेब्रुवारी साजरा करण्यात आला .
प्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी यांनी प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत यांनी कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान यावर प्रकाश झोत टाकला. महाविद्यलयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात मराठी पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले त्यात मराठीत विविध नामांकित कादंबऱ्या, ग्रंथ, कविता संग्रह इ पुस्तके वाचनासाठी ठेवलेली होती. राष्ट्रीय सेवा योजना तर्फे “माझे कुटुंब माझी जबाबदारी ” या विषयावर ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्राचे सूत्र संचालन प्रा. व्ही एस पवार (कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना) यांनी केले. सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे डॉ. के. एस. वाणी (प्राचार्य ) , डॉ. एस. पी. शेखावत ( उपप्राचार्य), प्रा. एम. व्ही रावलानी (सांस्कृतिक विभाग प्रमुख), डॉ. सुधीर पाटील ( ग्रंथपाल), श्री. एन. एम. काझी (सल्लागार विद्यार्थी विकास विभाग), प्रा. कृष्णा श्रीवास्तव व प्रा. रोहिदास बी. सांगोरे (विद्यार्थी विकास अधिकरी ) हे हजर होते.







