पारोळा;- तालुक्यातील वसंतवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक दिनांक 16 फेब्रुवारी रोजी संपन्न झाली.त्यात सरपंचपदासाठी रेखाबाई पवार व उपसरपंच पदी इंदल जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी हर्षल पाटील यांनी घोषित केले.त्यांना ग्रामसेवक महेंद्र सोनवणे यांचे सहकार्य लाभले.
वसंतवाडी येथे आमदार .चिमणराव पाटील यांचे समर्थक सरपंच कसळचंद पवार, सरपंच अनिल पवार, तसेच मा.सरपंच इंदल पवार, प्रभु पवार,साईदास पवार, अनिल पवार,भिला पवार,महारु पवार ,एकनाथ जाधव, रितेश पवार, धनराज जाधव, दगडु पवार,आबा पवार,रामदास जाधव,सुकलाल पवार,भारमल पवार,आलु पवार,बालु पवार ,देविदास पवार,विलास पवार,यांच्या मध्यस्थिने निवडणुक बिनविरोध झाली होती. त्यात आठ चे आठ उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते.निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत नवनिर्वाचित सदस्यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते आकाश भाऊ पवार यांनी नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना शुभेच्छा देत सांगितले की गावाने तुम्हाला दिलेल्या संधी चे सोने करा,सर्वांनी मतभेद विसरुन गावाच्या विकासासाठी एकत्र या व गावाचा विकास करा तसेच गावाने तुमच्यावर दाखवलेल्या विश्वास तुम्ही सार्थक ठरवणार अशी मला आशा आहे असे सांगितले. यावेळी गावाचा विकास करतांना सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे मत यावेळी नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंच यांनी निवडीप्रसंगी व्यक्त केले.








