साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
अमळनेर :- नाशिक परिक्षेत्राचे आय.जी.प्रतापराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सुरु असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर आज धाड टाकण्यात येऊन २८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे अवैध जुगार चालकांचे धाबे दणाणले आहेत . शहरात हि आता तिसरी कारवाई झाली आहे .
याबाबत माहिती अशी कि , स्थानिक पोलिसांना ही सुगावा न लागू देता आय जी.पथकाने आज पुन्हा 6 रोजी शहरातील मुख्य बाजारपेठ व वर्दळीच्या चार ठिकाणी छापे टाकून 28 जणांना सट्टा जुगार चालवताना रंगेहात पकडून त्यांच्याकडून सुमारे साडे तीन लाखाचा रोख रक्कम व दोन मोटरसायकलिंसह सट्टा जुगाराची साधने जप्त करण्यात आली आहेत.
यांनी केली कारवाई
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी सपोनि संदीप पाटील , सपोनि सचिन जाधव , उमाकांत खापरे , नितीन सपकाळे , राजेंद्र सोनवणे , सुरेश टांगोरे , विश्वेश हजारे ,नारायण लोहरे ,केतन पाटील यांचे गोपनीय पथक वेषांतर करून अमळनेर शहरात पाठवले.
यांच्यावर झाली कारवाई
त्यांनी शहरातील महात्मा गांधी शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील मच्छी मार्केट मध्ये पांडू भोई , बापू भगवान भोई , मनोज देवाजी पाटील , विजय आत्माराम महाजन , अशोक ईश्वर अहिरे , रामकृष्ण हिलाल पाटील यांना सट्टा जुगार खेळताना ताब्यात घेऊन 90 हजार 600 रुपये , सानेगुरुजी शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये संतोष मधुकर बनसोडे , जिजाबा भिका पाटील , रफिक बशीर खाटीक , शेख मुश्ताक शफीयोद्दीन , भूषण चौगुले हे सट्टा घेताना आढळून आले त्यांच्याजवळून 1 लाख 7 हजार रुपये जप्त करण्यात आले तसेच सुभाष चौकाजवळ लुल्ला मार्केट मध्ये संजय नथु सूर्यवंशी , सागर राम परदेशी , दिवाकर पांडुरंग ठाकूर , गणेश जगतराव पाटील हे सट्टा घेताना आढळून आले. त्यांच्याजवळून 25 हजार 500 रुपये जप्त करण्यात आले तर बसस्थानक व पोलिस वसाहतीच्या दरम्यान गांधीनगर भागात प्रल्हाद पाटील , प्रमोद काशिनाथ पाटील , जितेंद्र रामदास पाटील , रमेश फकीरा अहिरे , सचिन पुंडलिक पाटील , अरमान शहा कमाल शहा फकीर , पंकज राजेंद्र कोळी , गोकुळ विठ्ठल संनासे ,गोकुळ नरहर तायडे , बापू ठाकरे , सुधाकर ठाकूर , सुरेश पाटील , नारायण कोळी सट्टा घेताना आढळून आले त्यांच्याजवळून 1 लक्ष 8 हजार 170 रुपये असा एकूण 3 लाख 31 हजार 310 रुपये जप्त करण्यात आले.