रुग्ण संख्या १००१ वर पोहचली
जळगाव ;-सध्या जळगाव जिल्हयातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून प्रशासनाकडून प्राप्त माहिती नुसार आणखी 44 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून रुग्ण संख्या १००१ वर पोहचली आहे . जळगाव शहर ५ ,अमळनेर १० , रावेर ६ , एरंडोल १ , ,जामनेर २ , भुसावळ ५ ,चोपडा ९ , धरणगाव ४, चाळीसगाव २ , असे एकूण ४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत . अशी माहिती सूत्रांनी दिली आहे . काल ५० रुग्नांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते . तसेच ११५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे . ३९२ रुग्ण उपचार घेत असून ४४८ जण कोरोनामुक्त होऊन घरी बरे होऊन परतले आहेत . ४० रुग्ण अत्यवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे .