मुंबई (वृत्तसंस्था ) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर याप्रकरणी आता सीबीआयने देशमुख यांच्यासह या प्रकरणात संबंधित असलेल्या इतरांवर गुन्हा दाखल केला असून, देशमुख यांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू केली आहे. देशमुख यांच्या घर आणि कार्यालयात सुरू असलेल्या छापेमारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नामोल्लेख न करता भाजपाला सुनावलं आहे. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठीच सीबीआयचं धाडसत्र सुरू असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.








