जळगाव;- जुन्या भांडणाच्या वादातून कोल्हे हिल्स परिसरात दोना बेदम मारहाण करून वर्षभरापासून फरार असलेल्या संशयित आरोपीच्यआ एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहेत . अजय लक्ष्मण गरूड (वय-२४) रा. गेंदालाल मिल असे फरार आरोपीचे नाव आहे .

१४ मार्च२०२० रोजी र चेतन संजय छजला याला अजय गरूड आणि इतर जणांनी मारहाण केल्याची घटना घडली होती . तसेच शहरातील डिएसपी चौकात अजय गरूड, सोनू आढाळे हे दुचाकीवर येवून नेहल संजय शिंदे आणि विशाल अनिल घेंगट (वय-२१) यांनी घाबरून कोल्हे हिल्सकडे दुचाकीने पळ काढला. अजय गरूड आणि इतरांनी दोघांचा पाठलाग केला. पुढे दोघांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून अजय गरूड हा फरार होता. वर्षभरानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी अजय लक्ष्मण गरूड (वय-24) रा.गेंदालाल मील याला आज अटक केली.
यांच्या पथकाने केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, पो.ना. नितीन बाविस्कर, पो.ना. प्रीतम पाटील, पो.ना. राहुल पाटील, चालक स.फौ. रमेश जाधव यांनी त्याला राहत्या घरातून अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.







