जळगाव ;- एकीकडे शहरात संचारबंदी असताना अनेकजण विनाकारण फिरत असल्याने शहरात सकाळी गर्दी झाली होती . तसेच नागरिक ऐकायला तयार ओट नसल्याने त्यांना लाठी मारून त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली . दरम्यान पोलीस सतर्क होऊन रस्त्यावर उतरल्याने दुपारनंतर तुरळक वाहने व नागरिक दिसून आले
काहींना उठबशा काढण्याची शिक्षा-
राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तरीही नागरिक बाहेर पडत असल्याने पोलीस रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत. जळगावात ठिकठिकाणी कारवाई सुरू आहे. पोलीस आदेश न पाळणाऱ्या नागरिकांना लाठ्यांचा प्रसाद देत आहेत. काहींना उठबशा काढण्याचीही शिक्षा केली जात आहे.