हिंगोणा ता यावल ;- करोनाच्या पार्श्वभूमीवर गावात रेशन धान्य ग्रामस्थांना वेळेवर मिळत आहे किंवा नाही हे पाहणी करण्यासाठी फैजपुर येथील प्रांत अधिकारी डॉ .अजित थोरबोले हे पाहणी करण्यासाठी गावात दाखल झाले होते त्यांनी गावातील दोन्ही रेशन दुकानांची पाहणी करून गावातील स्थानिक नागरिकांकडून रेशन वेळेवर मिळते किंवा नाही गावात शांतता आहे किंवा नाही अशा विविध प्रकारच्या अनेक तक्रारी ग्रामस्थांकडून जाणून घेतल्या तसेच रेशन दुकानदार यानी धान्य वाटप करताना ग्राहकांना सुटसुटीत उभे करून वाटप करावे एकाच ठिकाणी गर्दी करु नये अश्या सूचना दिल्या