नवी दिल्ली : संपूर्ण जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला आहे तर दुसरीकडे ब्राझीलच्या अध्यक्षांनी कोरोनाला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच काही लोकांच्या मृत्यूसाठी देशाची अर्थव्यवस्था पणाला लावू शकत नसल्याचे धक्कादायक वक्तव्य त्यांनी केले आहे. ब्राझीलमध्येही करोनाही थैमान घातलं असून आतापर्यंत ३९०४ जणांना विषाणूंची लागण झाली असून ११४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. मात्र यानंतरही ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो लॉकडाउनच्या विरोधात आहेत.
जैर बोल्सोनारो यांना करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची कमी आणि अर्थव्यवस्थेची चिंता जास्त सतावत आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंसंबंधी बोलताना त्यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं असून एक दिवस असेही आपण सगळे मरणार आहोत असं म्हटलं आहे.जैर बोल्सोनारो यांनी करोनाला अत्यंत सामान्य फ्लू म्हटलं असून देशातील नागरिकांना अर्थव्यवस्था थांबता कामा नये असं आवाहन केलं आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अध्यक्ष जैर बोल्सोनारो आणि स्टेट्स गव्हर्नर यांच्यातील नाराजी समोर आली आहे.