जळगाव ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने टायगर ग्रुपतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शिवतीर्थ मैदान येथे आज करण्यात आले . यावेळी १७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन भारतीय सेनेचे सेवानिवृत्त जवान किरण महाजन व दिल्ली येथे भारताचे वीर जवान म्हणून कार्यरत असलेले मयूर वाघमारे यांच्याहस्ते छत्रपती शिवरायांना माल्यार्पणकरण्यात येऊन रक्तदान शिबिराला प्रत करण्यात आला .
रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहाने महिला व पुरुषांनी मिळून १७३ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली.
जळगाव जिल्हा राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेना व महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप अध्यक्ष पै. तानाजी जाधव , उत्तर महाराष्ट्राची बुलंद आवाज पै. सागर कांबळे , टायगर ग्रुप खानदेश विभाग अध्यक्ष पै. ऋषिकेश भंडारकर यांच्या मार्गदर्शनाखाली खानदेश टायगर ग्रुप यांचा सहभाग शिबिराला मोठ्या प्रमाणात लाभला. रक्तदान शिबिर रेड प्लस ब्लड बँक यांच्या सौजन्याने आयोजित केले.
या शिबिराला डॉ. भरत गायकवाड , डॉ. एम. देशपांडे , डॉ. एम पटेल ,शिबीराचे आयोजक विवेक प्रताप महाजन, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सपकाळ, लखन वालेचा, राकेश महाजन. टायगर ग्रुपचे जळगाव जिल्हा सामाजिक कार्यकर्ते गौरव उमप, सोपान मानकर, अजय भाऊ घूघे,दिपक गायकवाड, किरण चौधरी, मनोज बाविस्कर, कुणाल बारी, जितू निंबाळकर, रवींद्र पाटील, विशाल काकडे,बंटी ताडे व राष्ट्रीय हिंदू सुरक्षा सेनेचे जिल्हाध्यक्ष मयूर बारी, प्रदीप सोनार, हेमंत वडनेरे आदी उपस्थित होते . . रक्तदान करणार्या प्रत्येक रक्तदात्यांना सारा हॉस्पिटल,तर्फे छत्रपती शिवरायांचे टी-शर्ट वाटप करण्यात आले