शेळावे ता पारोळा ;- कोरोनाच्या भितीदायक वातावरणात व आदिवासी वस्तीत या आजारा बाबत जाणिव , जागृती व दक्षता निर्माण करण्यासाठी गावातील शाळेचे मुख्याध्यापक व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक मनवंतराव साळुंखे यांनी आपले मित्र गौरव गवांदे – शिंपी व साळुंखे यांच्या पत्नी चित्रा पाटील यांना घेवुन घरोघरी जावुन कोरोना बाबत माहिती देवुन याबाबत बालके , महिला व ग्रामस्थ यांना माहिती करून दिली . संपुर्ण गावात लहान थोर कोणीही मास्क वापरत नसल्याने व ते बाजारातही उपलब्ध नसल्याने गौरव गवांदे यांनी कापड खरेदी करून टेलर कडुन शिवुन घेतले व आज शक्य त्यांना वाटप केले . चित्रा पाटील यांनी विशेषतः महिलांना हॅण्डवॉशने हात धुण्यास लावुन वेळोवेळी साबण किंवा राखेने हात स्वच्छ धुण्याचे मार्गदर्शन करून हातावर सॅनिटायझर लावुन मास्क भेट दिले . तसेच काही कडुलिंबाचे व तुळशीचे बीयांसह पाने उकळुन ते थंड झाल्यावर गाळुन त्यात थोडी तुरटी व कापुरचे मिश्रण करुन स्वच्छ बाटलीत भरून त्याचा सॅनिटायझर सारखा वापर करण्याची सोपी व सहज उपलब्ध प्रक्रिया सांगितली . तसेच गुढी पाडवा हा आनंदाचा सण येत आहे या दिवशी घर स्वच्छतेसाठी खडक मीठाचा वापर,परीसर स्वच्छ करून घरात सकारात्मक उर्जा निर्माण करून वातावरणात वाढलेल्या उन्हाची काहिली कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुलिंबाची पाने वापरली जातात . प्राचीन काळापासुन चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा , मीठ , हिंग , मिरी आणि गुड हे कडुलिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात . यामुळे पचनक्रिया सुधारणं , पित्ताचा नाश करण , त्वचारोग बर करणे , धान्यातील कीड थांबवण हे सर्व कसे शक्य व सोपे आणि सहज करण्याजोगे आहे हा प्रयोग समजावुन दिला . मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी या वर्षाची गुढी ही आरोग्याची गुढी उभारण्याची सुचना करून . ”गुढी उभारू आरोग्याची , कोरोनाशी लढण्याची ” हा संदेश व याबाबत घेण्याची काळजी व दक्षतेचे फलक गुढीला लावुन शाळेच्या दर्शनी भागावर ग्रामस्थांच्या वापरतांना लक्षात यावे अशा ठिकाणी उभारली .
मराठी वर्षाचा हा नवा दिवस गुढी पाडवा गोड व आनंददायी व्हावा म्हणुन पाच गरिब आदिवासी महिलांना सुंदर साळी चोळी व मिठाईचे पाकिट व पाच अनाथ बालकांना मिठाईचे पाकिटे गौरव गवांदे – शिंपी यांनी वाटप करुन या महिलांचा व बालकांचा सण आनंदी व गोड केला . खुपच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पसरला होता .
गौरव गवांदे हे महावितरणला विद्युत सहाय्यक असल्याने मागे पाणीच्या मोटारीला चिटकलेल्या शितल भिल यांच्या घरी भेट देवुन यापुढे अशी घटना निष्काळजीपणामुळे होवु नये म्हणुन काही घरांचीही पाहणी केली .जवळ जवळ नऊ घरांमध्ये घरातील विद्युत वाहक वायरी या पिन न लावता तशाच बोर्डात आगकाडी खुपसुन ठेवलेल्या दिसल्या . त्यांना सोबत आणलेल्या पीन बसवुन त्या सुरक्षित केल्या . तसेच बऱ्याच ठिकाणी दोन वायरीचे तुकडे जोडुन त्यांना फडके किंवा प्लास्टिक कागद बांधलेले दिसुन आले ते काढुन सेलो टेप लावुन त्या सुरक्षित करण्यात आल्या . गौरव गवांदे यांच्या या सहकार्याचे व उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले .
शाळेचे मुख्याध्यापक यांनीही शाळेतील शक्य त्या विदयार्थ्यांच्या घरी जावुन . त्यांनाही सॅनेटायझर लावुन व मास्क वाटप करून त्यांच्या अभ्यासाचा आढावा व मार्गदर्शन करून नियोजन सांगितले .
गावात मास्क , साडी चोळी, बालकांना मिठाई वाटपाचा व आरोग्याची गुढी या पाडव्याची गुढी उभारण्याचा हा स्तुत्य व समाजोपयोगी उपक्रम बघु गावकरीमध्ये जागृती होवुन त्यांनी समाधान व्यक्त केले .