जळगाव – येथील गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयामध्ये एमबीए द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी भारतातील नामांकित एडझील टेक्नॉलॉजीज एलएलपी खराडी, पुणे या कंपनीतर्फे नुकतेच परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यात ४ विद्यार्थ्यांनी निवड झाली आहे.
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयातील मार्केटिंग व फायनान्स या विषयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात निकीता काळे, विशाल महाजन, सुशिल पाटील, राहुल चव्हाण यांची सेल्स एक्झ्युक्युटिव्ह पदी निवड झाली. या मुलाखती एडझील टेक्नॉलॉजी एलएलपी कंपनीच्या एचआर मॅनेजर प्रिया वंदना यांनी घेतल्या. या परिसर मुलाखतीचे आयोजन संस्थेचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा.एम.के.गोडबोले यांच्या समन्वयातून करण्यात आले होते.
सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, संस्थेचे संचालक प्रा.प्रशांत वारके यांनी अभिनंदन केले आहे.