जळगाव ;- विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे बुधवारी दुपारी ४ वाजता टॉवर चौकात ‘तांडव’ या वेब सिरीजचे पोस्टर व सिरीजमधील कलावंतांचे फोटो जाळण्यात अाले. तसेच पोस्टरला काळे फासण्यात आले .
गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेली ‘तांडव’ या वेब सिरीजमध्ये हिंदू धर्माच्या देवी-देवतांबद्दल अपशब्द वापरण्यात आलेला आहे. या घटनेचा निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हा मंत्री देवेंद्र भावसार, जिल्हाप्रमुख भरत कोळी, बजरंग दल जिल्हा संयोजक राकेश लोहार, बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रमुख राजू नन्नवरे, विश्व हिंदू परिषद महानगर उपाध्यक्ष हरीश कोल्हे, विश्व हिंदू परिषद महानगर मंत्री दीपक दाभाडे, समाधान पाटील, गोरक्षा प्रमुख आकाश पाटील, राहूल सूर्यवंशी, गोविंदा कुंभार, योगेश कोल्हे, पवन कोळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








