जळगाव ;– महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची जळगाव येथे धावती भेट असल्याने त्यांची रवींद्र भैय्या पाटील यांच्या घरी जाऊन जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी भेट घेऊन त्यांना ९ मागण्यांचे निवेदन दिले व चर्चा केली .
त्यात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील सर्व समाजाची प्रार्थना स्थळे त्वरित सुरू करण्यात यावी, त्यावर काही प्रमाणात संख्येवर मर्यादा असल्यास हरकत नाही . परंतु लोकांना नमाज अदा करु दया . रावेर दंगलीतील १५५ कैद्यांना नंदुरबार कारागृहात ठेवले आहे. त्यांना त्वरित अटी व शर्ती सह जामीन देण्यात यावा, जळगाव सामान्य रुग्णालय हे कोवीड हॉस्पिटल म्हणून कार्यरत असल्याने जळगाव येथील इतर आजाराबाबत रुग्णांना साकेगाव येथे जावे लागते त्याऐवजी जळगाव शहरातील एखादा दवाखाना अधिग्रहित करून त्या ठिकाणी जळगाव शहर वासियांना सेवा देण्यात यावी.
जळगावातील दोन खाजगी दवाखाने कोविड हॉस्पिटल म्हणून अधिग्रहित करण्याबाबतचे वृत्त प्रकाशित झाले असून सुद्धा अद्याप अंतिम कारवाई झाली नाही . तरी ते दोघेही खाजगी दवाखाने त्वरित अधिग्रहित करावे. जळगाव सामान्य रुग्णालय कोवीड हॉस्पिटल म्हणून कार्यरत असले तरी त्याठिकाणी मनुष्यबळ अपूर्ण आहे ते त्वरित भरण्यात यावे. तसेच त्या ठिकाणी आवश्यक की सोई, सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. कोरण्टेन सेंटर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जळगाव या ठिकाणी आवश्यक ती सोयी-सवलती तसेच तेथील रुग्ण पॉझिटिव आढळल्यावर त्याची रूम सेनिटाइजर करून बेड बदलून देण्यात यावी,त्याचप्रमाणे कोविड सेंटर म्हणून अल्पसंख्यांक महिला वसतिगृह या ठिकाणीसुद्धा अद्ययावत सोयी सवलती उपलब्ध करून द्याव्या व खास करून कुलर व जेवण देताना ज्या पद्धतीने दिले जाते ती पद्धत मानवता हीन आहे त्यावर लक्ष दिले पाहिजे.अशा मागण्यांचा समावेश आहे .
अशा एकूण नऊ मागण्या जळगाव जिल्हा मनियार बिरदारिने सादर केल्या असत्या ग्रह मंत्री माननीय देशमुख साहेब यांनी शांतपणे ऐकून यावर त्वरित योग्य ती कारवाई करतो व संबंधित अधिकाऱ्यांना आपले निवेदन माझ्या अभिप्राय सह सादर करतो असे आश्वासन दिले.
यावेळी मन्यार बिरादरीचे तय्यब शेख , राष्ट्र वादीचे अल्पसंख्यक अध्यक्ष गफ्फार मालिक,अध्यक्ष रविन्द्र भैय्या पाटिल,माजी मंत्री गुलाबराव देवकर,आमदार अनिल पाटिल हजर होते.