जळगाव ;- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीस ५० हजारांचा धनादेश आज तहसीलदार वैशाली हिंगे यांना सुपूर्द करण्यात आला . यावेळी पंचायत समिती सभापती नंदलाल पाटील , शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण , माजी उपसभापती डॉ. कमलाकर पाटील, पंचायत समिती सदस्य पती जनार्दन पाटील, तुषार महाजन आदी उपस्थित होते . पंचायत समिती सदस्य आणि शिवसेना तालुकातर्फे हा ५० हजारांचा निधी देण्यात आला आहे.