शेंदुर्णी, ता. जामनेर;- येथील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांचे पती गोविंद अग्रवाल यांच्या विरूध्द अॅट्रॉसिटीच्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
शेंदूर्णी येथील अरुण पंढरी सकट(वय २९ धंदा नोकरी शेंदूर्णी नगरपंचायत सफाई कामगार) यांनी पहुर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी – गोविंद मुरलीधर अग्रवाल (शेंदूर्णी नगरपंचायत उपनगराध्यक्षांचे पती) रा.शेंदूर्णी ता. जामनेर याच्यावर फिर्याद प्रमाणे सीसीटीएनएस गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२१ भा.द.वि. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३(१)(आर)(एस)भा.द.वि. कलम ३२३,५०४,५०६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे भाग पाचोरा हे करीत आहेत. दरम्यान शनिवारी शेंदूर्णी पोलीस दुरक्षेत्रावर घटनेतील फिर्यादी व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. उप विभागीय कार्यालयातील पोलीस कर्मचारी यांनी शेंदूर्णी नगरपंचायत कर्मचारी असलेले व अट्रॅसिटी घटनेतील साक्षीदारांचा व फिर्यादीचा जबाब नोंदविला. तर दुपारी ४ वाजता पाचोरा भाग उपविभागीय पोलीस अधिकारी भरत काकडे यांनी फिर्यादी,घटनेतील साक्षीदार व सरकारी पंचांसमक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.