जळगाव ( प्रतिनिधी ) शिवाजीनगर पुणे येथे दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात सूरज झंवर याचा सहभाग निष्पन्न झाला होता. त्यानुसार पथकाने 22 जानेवारी रोजी सूरज झंवर यास त्याच्या जळगाव शहरातील जयनगर येथील राहत्या घरुन अटक केली होती . सूरज झंवर याने सुप्रीम कोर्टातही जामिनासाठी धाव घेतली होती मात्र त्याचा जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बहुचर्चीत बीएचआर घोटळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेतर्फे तब्बल २५०० पानांचे पहिले दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून या सुमारे १२०० कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात पुण्यातील डेक्कन, आळंदी व शिक्रापूर या तीन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
बीएचआर घोटाळाप्रकरणी पुण्यात दाखल तीन गुन्ह्यांपैकी डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सूरज झंवर याला २२ जानेवारी रोजी जळगावातून अटक करण्यात आली होती.
सूरज याच्याकडून गुन्ह्याशी संदर्भात कागदपत्र, पुरावे पोलिसांना मिळाले होते. सूरजच्या कार्यालयात आढळलेल्या मालमत्तांच्या फायलींवरील स्वाक्षरी, साई मार्केटिंगमधील भागीदारी असल्याचे त्याने कबूल केले होते .सरकारी वकील अँड.प्रवीण चव्हाण यांनी सुरजच्या जामीन अर्ज विरोधात जोरदार युक्तिवाद केला होता सुरज हा मुख्य सूत्रधार असून त्याच्या कार्यालयात अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्र लॅपटॉप सापडले आहेत तसेच मालमत्ता विकणे मध्ये त्याची महत्त्वाची भूमिका होती त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा अशी अँड.चव्हाण यांनी न्यायालयाकडे मागणी केली होती. न्यायमूर्ती एस.एस.गोसावी यांच्या न्यायालयात कामकाज झाले होते. त्यांनी जामीन फेटाळला होता. मात्र सूरज झंवर याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्याने न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे .







