जळगाव ;- कुसुंबा येथील दाम्पत्याच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे चार जणांना अटक केली असून पैशांच्या तगाद्यावरून हा खून झाल्याचे निष्पन्न झाले असून यातील चौथ्या संशयित महिलेचा सहभाग नसल्याने तिला चौकशी करून सोडून देण्यात आले असून इतर तीन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली . हा खून आर्थिक लाभातून झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

कुसुंबा येथील ओमसाई नगरात राहणार्या तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दांपत्याचा अलीकडेच खून झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासातून पाटील दाम्पत्याच्या व्याजाच्या व्यवसायातून हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले होते. या दिशेने तपास केला असता आरोपींची खातरजमा करण्यात आला. यानंतर आज पहाटे चार वाजता चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यात सुधाकर रामलाल पाटील (४०, चिंचखेडा,ता.जामनेर), देविदास नामदेव पाटील (४०), अरुणाबाई गजानन वारंगे (३०) यांना अटक करण्यात आली आहे. अरुणाबाई व देविदास यांना कुसुंब्यातून तर सुधाकर याला चिंचखेडा येथून ताब्यात घेण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.







