जळगाव ( प्रतिनिधी ) ;-देशात १४ फेब्रुवारी २०१९ या काळ्या दिवशी आपल्या वीर सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्लात ४० वीर सैनिकांना मरण आले, तरी त्यांच्या स्मरणार्थ गावातील सर्व तरुण कार्यकर्ते तसेच वरीष्ठ, जेष्ठ, समस्त ग्रामस्थ , भजनी मंडळ यांच्या सहकार्याने ह.भ.प.श्रीकांत बाबा पुणेकर यांच्या आशिर्वादाने चार दिवसीय किर्तनाचे आयोजन करण्यात आले असून आज सायंकाळी ४ ते ६ यावेळेत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . तसेच उद्या दुपारी महाप्रसाद आणि काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे .

चार दिवसीय या कीर्तन सोहळ्यात ह.भ.प.किर्तन भुषण पंकज महाराज,हभप अतुल महाराज ,हभप रविकिरण महाराज , हभप गजानन महाराज यांचे कीर्तन आणि काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून कीर्तनाच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतून शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती लाभत आहे . दापोरा येथील नवदुर्गा चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मुदंगाचार्य – ह.भ.प. गोपाल महाराज दापोरीकर. गायनाचार्य – ह.भ.प.श्रीकांत महाराज खडके, हभप नितीन महाराज शिरसोली, ह.भ.प.दिपक महाराज कठोली, ह.भ.प. उदय महाराज खलाणे, ह.भ.प. एकनाथ महाराज,निपडारी, ह.भ.प. योगेश महाराज दापारी, ह.’भ.प,चेतन महाराज दापोरी, सपस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, दापोरा नारायण साऊण्ड मिस्टम,रतिलाल कोळी, राजु रमेश चव्हाण, लक्ष्मण भरत बिर््हाडे, पंडीत बसंत कोळी , सैनिक सत्कार सेवा -रंगलाल शिवा कोळी महेंद्र रामदास चव्हाण, ज्ञानेश्वर सुकलाल कोळी , मुकुंदा रामकृष्ण भोई , महेंद्र नथ्थु कोळी , प्रकाश सुका कोळी पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ व माऊली वारकरी शिक्षण संस्था धरणगावचे विद्यार्थी
रविंद्र रामदास चव्हाण देशाचे देश सेवक आजी सैनिक व माजी सैनिक , श्री श्री १००८ महामण्डलेश्वर भगवानदासजी बाबा,
भजनी मंडळ, ह.भ.प.युवाकिर्तनकार गोपाल महाराज, दापोरी तरुण मित्र मंडळ, दापोरा, आदींचे कार्यक्रमाला अनमोल सहकार्य लाभत आहे .







