जळगाव शहरात ९४ रुग्ण ; रुग्णसंख्या झाली ६ हजार ३९३
जळगाव;– शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग काही थांबत नसून दररोज कोरोनाच्या रुग्णसंख्येने द्विशतक पार केले असून आज पुन्हा नव्याने २२६ कोरोना रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आज आले आहेत . त्यामुळे रुग्ण संख्या ६ हजार ३९३ इतकी झाली आहे.यात जळगाव शहर ९४ ,जळगाव ग्रामीण २८ जामनेर-२५; चोपडा-२४; अमळनेर-२१ ,भुसावळ-१०; पाचोरा-२; भडगाव-६; धरणगाव-३; यावल-२; एरंडोल-५; पारोळा-३; चाळीसगाव व बोदवड-प्रत्येकी १ व अन्य जिल्ह्यातील १ अशी रूग्ण आढळून आले आहेत. प्रशासनाच्या माहितीनुसार आज झालेल्या प्राप्त अहवालानुसार अशी रूग्ण संख्या झाली आहे .
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ६३९३ इतका झालेला आहे. यातील ३८८७ रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या कोविड केअर सेंटरमध्ये-१५४९; कोविड हॉस्पीटलमध्ये-१२७ तर डेडीकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये २६३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ८ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ३४३ इतकी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
————————