चाळीसगाव शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे सुशोभीकरण काम सध्या प्रगतीपथावर आहेत. यामुळे या उद्यानाचा कायापालट सुरू आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक अविस्मरणीय आठवणी चाळीसगाव शहरासोबत विशेषत या परिसरासोबत जोडल्या गेल्या आहेत. त्यांना उजाळा देण्यासाठी डॉ.आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांसोबतच्या आठवणीं असलेल्या भिंतीचित्रके लावणार असल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज येथे व्यक्त केली . डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सुरू असलेल्या
या कामांना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज भेट दिली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, रा वी संचालक विश्वासराव चव्हाण, संजय गांधी अध्यक्ष के.बी. साळुंखे,तालुकाध्यक्ष सुनील निकम,शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, सभापती रोशन दादा जाधव, सामाजिक कार्यकर्ते गणेश चौधरी, ज्येष्ठ पदाधिकारी दिलीप गवळी ,एड. प्रशांत पालवे, सचिन पवार , माजी पंचायत समितीचे सदस्य रवींद्र चौधरी तरवाडेकर, बबलू जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनेक आठवणी .चाळीसगाव शहराशी निगडित असून या
आठवणींच्या अनुषंगाने या उद्यानात भिंतीचित्रके देखावे साकारले जातील हा परिसर शहराची शोभा वाढवणारे ठरेल. उद्यानात विविध कामे येथे सुरू असून या पुतळा परिसराचे काम वेगात सुरू असल्याचे समाधान आहे. अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव आणि विश्वास चव्हाण यांनी प्रगतीपथावर सुरू असलेल्या कामांची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांना दिली. आपल्या दूरदृष्टी आणि नियोजनातून या उद्यानाचा कायापालट होत आहे. याबद्दल खासदार उन्मेश दादा यांचे रोशन जाधव यांनी आभार व्यक्त केले.