जळगाव ;- एकीकडे राज्यशासन आणि केंद्रशासन कोरोना आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी अत्यंत महत्वाचे निर्णय घेत असताना मात्र जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणा फारसे गाम्भीर्य घेत नसल्याचे चित्र आज दुपारी पाहायला मिळाले. त्यामुळे एकीकडे राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये सज्ज असतांना जिल्हा रुग्णालयात याहून उलटे चित्र दिसून येत असून जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या कोरोना संशयित रुग्णांची ससेहोलपट होत आहे . तसेच ओपीडीवर कार्यरत डॉक्टरांकडून रुग्णांना अरेरावी करण्यात येऊन त्यांना कोरोनाची तपासणी दुसरीकडे म्हणजेच अपंग वाँर्डकडे करा असे सांगण्यात आल्याने यातील काही दहा बारा पेशंट हे गेले असता तुम्ही १ नंबरच्या ओपीडीवर तपासणी करा असे सांगत असल्याने या तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागला . मात्र ओपीडीवरील कार्यरत डॉ. दीपक जाधव यांचाही रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नसल्याचे रुग्णांनी सांगत तेच स्वतः निराशाजक मनस्थितीत दिसून आल्याचे काही रुग्णाणी सांगितले . मात्र नेमकी तपासणी कुठे करण्यात येत आहे याचाच खुलासा जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना होत नसल्याचे आढळून आले . मात्र तपासणी हि नेत्र कक्षात होत असल्याचे समजल्याने अनेक रुग्णांनी तिकडे धाव घेतली .