कृषिमंत्री दादा भुसे यांची टिका ; जिल्ह्यातील खरीप तयारीचा आढावा
जळगाव ;- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती . यावर कृषी मंत्री दादा भुसे यांनी निशाणा साधून नारायण राणे हे केंद्रातही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतील . ते तर ‘महान नेते आहेत अशी टीका केली .
जळगाव, धुळे, नंदुरबार तीन जिल्ह्यातील खरीप तयारीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्री दादा भुसे जळगावला आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीचे शासन अपयशी ठरले असून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यानं राष्ट्रपती लागवट लागू करण्याची मागणी केली होती . मात्र
शासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न करीत असून राणे यांनी राजकारण करू नये अशी टीका ना. दादा भुसे यांनी यावेळी बोलताना केली .
पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे आदी यावेळी उपस्थित होते.