पारोळा (प्रतिनिधी ) ;- येथील लोकमान्य टिळक शिक्षण संस्था संचालित, पारोळा शहरातील एकमेव सी.बी.एस.ई. बोहरा सेंट्रल स्कूल येथे आज रोजी पालक-शिक्षक संघाच्या उपस्थित जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला .या प्रसंगी पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष रावसाहेब भोसले , उपाध्यक्ष रवींद्र पाटील, एरंडोल व पालक शिक्षक संघाचे सदस्य डॉ. योगेंद्र पवार, सौ बाविस्कर , कैलास पाटील, निकाळजे यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण करण्यात आले. यात मुख्यत्वे ऑक्सिजनचा जास्तीत जास्त पुरवठा करणारी वृक्ष असे कडुनिंब व इतर झाडे लावण्यात आली. संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा ,शाळेचे प्राचार्य शोभा सोनी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी वृक्षारोपना नंतर लावलेले वृक्ष योग्य प्रकारे संवर्धन करून वाढवण्याचा या पर्यावरण दिनी संकल्प केला.