वाराणसी ( वृत्तसंस्था );- शहरात एका नवजात बाळाला जन्मताच कोरोनाची लागण झाली आहे. आश्चर्य म्हणजे त्या बाळाच्या आईची प्रसूती आधीची चाचणी निगेटीव्ह आली होती. तर बाळ जन्मताच त्याची केलेली चाचणी पॉझिटिव्ह आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. बनारस हिंदू युनिव्हर्सिटीच्या एसएस रुग्णालयात हा प्रकार समोर आला आहे.

२४ मे रोजी सदर गरोदर महिला रुग्णालयात दाखल झाली. त्यावेळी तिची कोरोना चाचणी करण्यात आली. तिची चाचणी निगेटिव्ह आली. २५ मे रोजी सदर महिलेने एका मुलीला जन्म दिला. मात्र त्या मुलीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे. रुग्णालयातील डॉक्टर देखील या प्रकाराने भांबावले असून लवकरच बाळाची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.







