जळगाव ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात मागासवर्गीय संघटनेतर्फे मंगळवार दि.२६ मे रोजी आयोजित रक्तदान शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा एकूण ४५ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने सदरचे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
हे रक्तदान शिबीर रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्यांने आयोजित करण्यात आले. शिबीराचे उदघाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्र- कुलसचिव प्रा.पी.पी. माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार , व्य.प.सदस्य प्रा.रत्नमाला बेंद्रे, प्रा.भुषण चौधरी, प्रा.किशोर पवार उपस्थितीत होते. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अरूण सपकाळे सचिव, राजू सोनवणे, जयंत सोनवणे, सुनील आढाव,सुभाष पवार, पदमाकर कोठावदे, भिमराव तायडे, चंदन मोरे व समाजकार्य प्रशाळेचे विद्यार्थी आकाश धनगर, रोहन अवचारे यांनी मोलाचे सहकार्य केले. रेडक्रॉस सोसायटीचे डॉ. .चौधरी,डॉ. कोळी, शिंपी आदींनी रक्त संकलन केले.४५ रक्तदात्यांनी यावेळी रक्त दिले.विशेष म्हणजे महिलांमध्ये सोनाली लोखंडे, नेहा आढाव, निता शिंदे, आदिती शिंदे, हर्षाली सुर्यवंशी यांनीही रक्तदान केले