जळगाव (प्रतिनिधी) ;– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व फिरते लसीकरण केंद्र,जिल्हा आरोग्य विभाग,जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात आयोजित लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ८० जणांचे लसीकरण करण्यात आले.
विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेत्तर अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी, दैनिक वेतनिक आणि सुरक्षारक्षक यांच्यासाठी कोविड-१९ च्या पार्श्वभुमीवर लसीकरणाचा दुसरा टप्पा गुरूवार दि.२७ मे, २०२१ रोजी आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरु प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.मोहन पावरा, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी एस.आर.गोहिल, प्रा.ई.वायुनंदन यांनी विद्यापीठात होत असलेल्या लसीकरणाबद्दल आनंद व्यक्त केला. यावेळी लस घेतल्यानंतर विद्यापीठातील कर्मचारी श्री. वासुदेव कोळी व निवृत्त कर्मचारी श्री. जमाले यांना प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही. पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष बडगुजर, डाटा ऑपरेटर प्रदीप पाटील, आरोग्य कर्मचारी विकास धनगर, हितेश महाजन हे उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी डॉ. किशोर पवार, विद्यापीठ अभियंता आर.आय.पाटील, सुभाष पवार, डॉ. सोमनाथ वडनेरे, अरूण सपकाळे, राजू सोनवणे, एस.बी. पाटील, बाळासाहेब पाटील, शेखर बोरसे, इत्यादींनी परिश्रम घेतले.