नवी दिल्ली: (वृत्तसंस्था ) ;- देशात दिवसभरात २ लाख ११ हजार २९८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचसोबत, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ वर पोहचली आहे. देशात सध्या २४ लाख १९ हजार ९०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आज (सोमवारी) सकाळी आरोग्य मंत्रालयानं जाहीर केली आहे.
देशातील परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. तसेच गेल्या काही दिवसांच्या तुलनेत मृतांचा आकडा देखील आज कमी झाला आहे. गेल्या २४ तासांत ३८४७ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे, आतापर्यंत देशात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांची एकूण संख्या ३ लाख १५ हजार २३५वर पोहचली आहे.
देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ वर पोहचली आहे. तर याच २४ तासांत तब्बल २ लाख ८३ हजार १३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच देशभरात आतापर्यंत २ कोटी ४६ लाख ३३ हजार ९५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.