चाळीसगाव : – केंद्र सरकारच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे आज दुपारी शहरातील धुळेरोडवरील पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची भाववाढ केली म्हणून आंदोलन केले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति बॅरेल क्रूड ऑइलची किंमत कमी असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या तुलनेत भारतात सर्वाधिक दराने पेट्रोल, डिझेल व गॅसच्या भावात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. याचा निषेध म्हणून प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस यांच्या आदेशाने येथे दरवाढीविरोधात पेट्रोल पंपावर युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष हितेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अंबादास गोसावी, जिल्हा सरचिटणीस अमोल राऊळ, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल सरचिटणीस अशोक खलाणे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सदस्य बाळासाहेब भाऊराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बारकू मधु गवळी, शहराध्यक्ष प्रज्वल जाधव, काँग्रेस कमिटीचे प्रदीप देशमुख, पंकज शिरुडे, एन एस यु आयचे आदित्य खलाणे, युवक काँग्रेसचे पवन जाधव, भूषण पाटील, ज्ञानेश्वर वाघ, भूषण भडक व काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटीचे नितीन सूर्यवंशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.







