जळगाव,;- नागरीकांच्या तक्रारी, गाऱ्हाणी सोडविण्यासाठी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार, दिनांक 1 फेब्रुवारी, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिलदार, जळगाव यांचे अध्यक्षतेखाली तहसिल कार्यालय, जळगाव येथे तालुका स्तरावरील लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व संबंधितांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा. असे नामदेव पाटील, तहसिलदार, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.








