जळगाव ;-अजिंठा चौफुलीवरून मालवाहतूक करणारे वाहन अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी , मनोहर ज्ञानदेव पवार (वय-३८) रा. त्रिमुर्ती नगर, सुप्रिम कॉलनी हे खासगी मालवाहू गाडीचे चालक आहे. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे मालवाहू (एमएच १९ बीएम ०२४४) क्रमांकाची चारचाकी गाडी आहे. मिळेल ते भाड्याने माल वाहण्याचे काम करतात. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील अजिठा चौफुलीजवळील सुरभी लॉनजवळ त्यांनी मालवाहू गाडी पार्किंगला लावली व कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ते परत आले असता त्यांना मालवाहू गाडी दिसून आली नाही. संपुर्ण परिसर शोधूनही वाहन मिळाले नाही. चालक मनोहर पवार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ गफ्फार तडवी करीत आहे.








