जळगाव ;-सोमवारी संपूर्ण भारतात ईद साजरी करण्यात आली . जळगावात सुद्धा सर्वांनी आपापल्या घरी ईद साजरी केली . परंतु ३ लहान बालके अनुक्रमे हंजला , वय आठ वर्षे, हमजा वय वर्ष दहा व तलहा वय वर्ष 12 या तिघा भावंडांनी आपले आई ,वडील व इतर नातेवाईकानी वर्षभर जे पैसे दिले होते ते पैसे आपापल्या गल्ल्यांमध्ये शिल्लक ठेवायचे व ईदला ते काढून काहीतरी वस्तु स्वता साठी घ्यायचे . परंतु यंदा त्यांनी आपले गल्ले उघडून सदरचे ३९९५ रुपये व आजची ईदी पालकांनी दिलेली १००५ रु असे एकूण ५००० रुपये जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख ,संचालक सलीम मोहम्मद व यूसुफ अहमद यांच्या स्वाधीन केली. या पैशातून आपण गरिबांना जे धान्य रेशन कीट उपलब्ध करून देत आहात त्यासाठी या पैशांचा वापर करा. तेव्हा उपस्थितांच्या डोळ्यात एकाच वेळी आनंद अश्रु सोबत मुलांवर होत असलेल्या संस्कारा बाबत अभिमान सुद्धा झाला.
सदरची तिन्ही मुले अँग्लो उर्दू हायस्कूल मधील शिक्षक तय्यब शेख इब्राहिम यांची आहे. यावेळी फारुक शेख यांनी मुलांचे व पालकांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले