जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील मुक्ताईनगर मध्ये आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास रस्त्याने ग्रॅनाईट घेऊन जाणाऱ्या रिक्षावर अचानक झाड कोसळले . मात्र वेळीच प्रसंगावधान दाखवून चालकाने उडी मारल्याने ते बालंबाल बचावल्याची घटना उघडकीस आली आहे.
रिक्षा चालक शंकर एरंडे असे व्यक्तीचे नाव असून रिक्षा मात्र झाड कोसळल्याने चक्काचूर झाली. यात हजारोंचे नुकसान झाले. सामाजिक कार्यकर्ते
राहुल सुरेश पाटील यांनी घटनास्थळी पोहचून वीज मंडळ कार्यालय आणि मनपा कर्मचाऱ्यांना तातडीने कालवून याबाबत माहिती दिल्याने कर्मचाऱयांनी तात्काळ धाव घेत झाड बाजूला केले.