जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथील भिल्लवस्तीच्या पुढे असणार्या खळ्याजवळ सार्वजनिक ठिकाणी झन्ना-मन्ना नावाचा पत्त्याचा खेळ खेळणार्या तिघांना आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम आणि दोन मोटर सायकली असा एकुण 50 हजार 740 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यामुळे गावात जुगार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भिल्ल वस्तीच्या पुढे असणार्या खळ्यात मधुकर अटवाल, जगदीश भास्करराव बारी, अनिल गोपाळ बारी हे जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्याकडून मोटर सायकल क्र.एम.एच.19,बी.आर. 1787, एम.एच.19,ए.व्ही.5222 यासह रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून आले.
तिघांविरूध्द एमआयडीसी पोलिस स्टेशनला मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.