जळगाव ;– करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे जिकरीचे झाले आहे. शैक्षणिक संस्था मात्र कोणत्याही प्रकारची तडजोड करायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यालायने निर्देश देऊनही शिक्षण संस्था आपल्या शुल्का मध्ये एक रुपयाही कमी करण्यास तयार नाही. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश चे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर एक पाऊल विद्यार्थ्यांसाठी हि मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, डॉ. सतिष पाटील,विभागाचे अध्यक्ष चिन्मय गाढे व जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली खालील मुद्यांवर आम्ही आक्रमक भूमिका घेणार आहोत असे सरचिटणी लोकेश पवार यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचा मान ठेवत सर्व शिक्षण संस्थांनी आपल्या शिक्षण शुल्कात ( Tuition Fee) सरसकट कपात करावी. त्याचबरोबर विदयार्थी ज्या सुविधा वापरत नाहीत त्याचे शुल्क आकारू नये.ज्या सुविधा विदयार्थी वापरत नसतानाही शिक्षण संस्था त्याचे शुल्क आकारत असेल तर अश्या संस्थांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईलया मोहिमेत ,आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हासरचिटनिस लोकेश पवार यांनी केले आहे.







