पाचोरा ( प्रतिनिधी ) – कजगाव रेल्वे स्थानका नजीक कोणत्यातरी धावत्या प्रवाशी रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राकडुन प्राप्त माहिती अशी की, कजगाव रेल्वे स्थानका नजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३४६ / १८ / २० जवळ अप लुप लाईनवर एका पुरुषाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्रास मिळाल्यानंतर तात्काळ पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे ए. एस. आय. अनिंद्र नगराळे हे रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांचेसह घटनास्थळी दाखल झाले. अनिंद्र नगराळे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत रुग्णवाहिका चालक बबलु मराठे यांच्या मदतीने मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.