जळगाव ( प्रतिनिधी )- धावती डस्टर कार जळगाव – धुळे महामार्गावर महामार्गावर बांभोरी गावाजवळ अचानक शॉर्ट सर्किटमुळे पेटली . सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही . परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेने या कारमधील ४ लोकांचे प्राण वाचले.
एम एच ०२ – डी एन – ००७९ क्रमांकाची ही रेनॉल्ट डस्टर प्रतिभाताई पाटील कॉलेजच्यासमोर हायवेरोडवर बांभोरी गावाजवळ अचानक पेटली होती . अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यात मदत केली . माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे वाहन चालक देविदास सुरवाडे हे फायरमन रोहिदास चौधरी , हिरामण बावस्कर , पन्नालाल सोनवणे आदींसह घटनास्थळी गेले होते . त्यांनी आग आटोक्यात आणली . त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली . दुपारी 03 वाजून 05 मिनिटांनी या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली होती . त्यानंतर १५ मिनिटात हे कर्मचारी घटनास्थळी पोहचले होते . या वाहनातून कोण , कुठे जात होते ? कोणाच्या मालकीचे वाहन आहे ? , याची माहिती मात्र लगेच समजू शकली नाही . परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेने व त्यांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे या कारमधील ४ लोकांचे प्राण वाचले.