मुंबई (वृत्तसंस्था ) – दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये गर्दी जमवण्यासाठी चांगलीच शर्यत रंगली आहे. राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे. शिंदे गटाने समर्थकांना आणण्यासाठी तब्बल १७०० एसटी बसेसचं बुकिंग केल्याचे समोर आले आहे.
यासाठी तब्बल १० कोटी रुपये रोख भरले असल्याचे समजते. शिवसेनेला टक्कर देत शिंदे गट मुंबईतील बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेत आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. शिंदे गटाकडून राज्यभरातून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे.
दसरा मेळाव्यामुळे एसटी महामंडळाला सोन्याचे दिवस आले आहे. शिंदे गटाकडून तब्बल १७०० हून अधिक लालपरी बसेसचं बुकिंग करण्यात आले आहे. यासाठी शिंदे गटाने तब्बल १० कोटी रुपये रोख भरले आहे. ही रक्कम मोजण्यासाठी रविवार आणि सोमवार असे दोन दिवस लागले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.