खिर्डी ता. रावेर (सादिक पिंजारी) – बोगस कागदपत्र तयार करून 30 में , 2021 रोजी ग्रामविकास अधिकारी व ग्रा सदस्य यांनी लिहून घेतलेला दारू परवाना विक्रीचा ठराव रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन आज खिर्डी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी गट विकास अधिकारी यांना दिले आहे.
खिर्डी बुद्रुक ग्रा.पंची ग्रामसभा 27 ऑगस्ट , 2021 रोजीचा अजेंडा प्रसिद्ध करण्यात आला होता. ती सभा कोरमअभावी तहकुब करण्यात आली होती ती तहकूब सभा नंतर झाल्यावर कोणताही विषय नसतांना किंवा चर्चा न करता जनाबाई काशिनाथ तायडे यांचे नावाने तांदलवाडी येथे असलेले देशी दारूचे परवाना दुकान खिर्डी बु ला येथे गट क्र ३८३ मध्ये जो ग्राम. दप्तरी नाही किंवा एन. ए. नाही अशा भरवस्तीतील जागेवर नाहरकत परवानगी देण्याचा खोटा ठराव ग्रामविकास अधिकारी विजयकुमार महाजन व काही ग्रा.प.सदस्य यांनी लिहुन त्याच्या प्रती जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचेकडे पाठविला यापूर्वी गावात कोणतेही दारुचे परवाना दुकानास परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव घेण्यात आला आहे. महिला ग्रामसभा घेऊन दारूबंदीचा सुध्दा ठराव सुद्धा करण्यात आला आहे. त्यामुळे हा खोटा ठराव ठराव रद्द करून संबधितांवर कारवाई करण्यात अशी मागणी करण्यात आली आहे
आज ग्रामस्थांनी असा ठराव का केला याचा जाब ग्राम विकास अधिकारी विजयकुमार महाजन यांना विचारला सर्व ग्रामस्थांनी घेराव घातला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते यावेळी निंभोरा पोलीस ठाण्याचे पोउनि काशिनाथ कोळंबे , पोहेका स्वप्नील पाटील, बापू पाटील व पोलीस ताफा दाखल झाल्याने गर्दीला पांगवण्यात आले नंतर गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल , डी एस सोनवणे यांनी ग्रामपंचायतीमधे आल्यावर अवैध ठराव रद्द करून ग्राम विकास अधिकारी विजयकुमार महाजन व संबंधित ग्राम पंचायत सदस्य यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
खिर्डी या गावात या पूर्वी वैध व अवैध दारू विक्रीचा ठराव 2017 मधे होवून 1519 महीलान पैकी 885 महिलांनी मतदान करून खिर्डी गावातील बाटली आडवी केली होती त्यानंतर खिर्डी येथील दारू दुकाने सील करण्यात आली होती. परंतु पुन्हा ही वैध व अवैध दारू विक्रीची दुकाने पुन्हा सुरू झाली असल्याने दारूचे दुकान खिर्डी येथे येण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला.