चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनची कामगिरी
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील पातोडा गावात पडलेल्या दरोड्याचा गुन्हा १२ तासात उघड करण्यात चाळीसगाव पोलीसांच्या पथकाला यश आले आहे. दरोड्याच्या संशयित आरोपींकडून ७८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती पत्रपरिषदेत पोलिसांकडून देण्यात आली.
तक्रारदार अनुसया रघुनाथ माळी (वय ६० वर्षे रा. पातोंडा) यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चाळीसगांव शहर पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांचे रहाते उघड्या घरात प्रवेश करुन अज्ञात आरोपीतांनी फिर्यादीस दमबाजी करुन फिर्यादीचे अंगावरील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण ४२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला होता. पोलिसांच्या पथकाने संशयित आरोपी अमोल कडबा भोसरे (वय २०), शरद सुधाकर चव्हाण (वय २०), सुधिर मल्लप्पा चव्हाण (वय २०), अभिषेक भोसले (सर्व रा. मंगरूळ तांडा ता. जितूर जि. परभणी) व एक विधीसंघर्षीत बालक अश्यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी एक विधिसंघर्ष बालक यांस बाल न्याय मंडळ यांचे कडेस हजर करण्यात येवुन आरोपीतांची पोलीस रिमांड घेतली आहे. त्याचे कडुन गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मालापैकी ७८ हजार ६०० रुपये कि.चा माल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, पोलीस उप निरीक्षक संदिप घुले, पोहेकों अजय पाटील, राकेश पाटील राहुल सोनवणे, योगेश बेलदार विजय पाटील, नरेद्र चौधरी अश्या पथकाने केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.